धुळ्यात रेडीयम दुकानाला आग, वस्तू खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:20 IST2018-11-03T22:19:23+5:302018-11-03T22:20:14+5:30

ऐंशी फुटीरोडवरील घटना : पाच लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Fire extinguishers shop in Dhule | धुळ्यात रेडीयम दुकानाला आग, वस्तू खाक

धुळ्यात रेडीयम दुकानाला आग, वस्तू खाक

ठळक मुद्देऐंशी फुटी रोडवरील घटनासुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ऐंशी फुटी रोडवर असलेल्या एका रेडीयमच्या दुकानाला शनिवारी पहाटे अचानक आग लागली़ यात रेडीयमसह फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे़ 
शहरातील ऐंशी फुटी रोडवर लोकमान्य हॉस्पिटल समोरील भागात रईस अहमद शेख (२७) यांच्या मालकीचे रईस रेडीयम नावाचे दुकान आहे़ या दुकानात रेडीयमसह फर्निचर, संगणक, सीपीओ, मॉनिटर, कटींग मशिन अशा विविध वस्तू होत्या़ शनिवारी पहाटे या दुकानाला अचानक आग लागली़ यात दुकानातील विविध वस्तू जळून खाक झाल्या आहेत़ ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे समजू शकलेले नाही़ आगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला कळविण्यात आली़ बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली़ यात पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ आग लागल्याच्या ठिकाणाजवळच आॅईलचे दुकान होते़ आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला़ सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़

Web Title: Fire extinguishers shop in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.