अजनाड बंगलाजवळ धावत्या कारला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 11:54 IST2019-07-28T11:53:41+5:302019-07-28T11:54:05+5:30
बभळाज : सुदैवाने जीवितहानी टळली

अजनाड बंगलाजवळ धावत्या कारला लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळच द बर्निंगची कारची दुर्घटना रविवारी सकाळी घडली़ कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे़ गावकºयांच्या मदतीने कार विझविण्यात आली़ जळगाव येथील रामचंद्र विराणी आपल्या कुटुंबियांसमवेत एमएच १९ - ४४१९ क्रमांकाच्या कारने शिरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना ही घटना घडली़ कार पेटत असल्याने परिसरातील गावकºयांनी ही बाब निदर्शनास आणून दिली़ त्यानंतर अनेकांनी गर्दी करीत कार विझविली़ या भागात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे़