धुळ्यात काटेरी झुडूपांना आग, सुदैवाने हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:43 IST2018-05-16T22:43:41+5:302018-05-16T22:43:41+5:30
तीन बंबांची मदत : साक्री रोडवरील घटना

धुळ्यात काटेरी झुडूपांना आग, सुदैवाने हानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्री रोडवरील पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील काटेरी झुडूप, गवताला बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास आग लागली़ महापालिकेच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्यात आली़ सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही़
शहरातील साक्री रोडवरील हॉटेल कृष्णाई समोर पेट्रोल पंपाशेजारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ च्या नजिक असलेल्या मोकळ्या जागेत बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ काटेरी झुडूपे आणि गवत असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले़ जवळच पेट्रोल पंप आणि राज्य राखीव पोलीस दलाची वाहने असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज आल्याने तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ एका पाठोपाठ एक याप्रमाणे तीन बंब दाखल झाले़ त्यामुळे आग आटोक्यात आली़ दुपारी उशिरापर्यंत बंबाने आग विझविण्याचे काम मार्गी लावले जात होते़
या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही़ तालुका पोलिसात देखील नोंद झाली नव्हती़