मुक्तबंदी व परीविक्षाधिनांच्या पुनर्वसनासाठी अर्थसाहाय्य योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:40+5:302021-09-09T04:43:40+5:30

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सुधार कायद्यांतर्गत अपराधी परीविक्षा अधिनियमानुसार चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर शिक्षा न देता न्यायालयाने देखरेखीखाली ...

Financial assistance scheme for release and rehabilitation of probationers | मुक्तबंदी व परीविक्षाधिनांच्या पुनर्वसनासाठी अर्थसाहाय्य योजना

मुक्तबंदी व परीविक्षाधिनांच्या पुनर्वसनासाठी अर्थसाहाय्य योजना

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सुधार कायद्यांतर्गत अपराधी परीविक्षा अधिनियमानुसार चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर शिक्षा न देता न्यायालयाने देखरेखीखाली सोडलेले परीविक्षाधिनांचे पुनर्वसन व स्वयंरोजगारासाठी २५ हजार रुपये अर्थसाहाय्य वस्तू रूपात उपलब्ध करून देण्यात येते. ज्याद्वारे मुक्तबंदी व परीविक्षाधीन यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांची समाजात पुनर्स्थापना करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कारागृहातून शिक्षा भोगून मुक्त झालेले बंदी व न्यायालयाने देखरेखीखाली सोडलेले परीविक्षाधीन ज्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत: अथवा कुटुंबामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्रमांक ५२, जयहिंद कॉलनी देवपूर, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Financial assistance scheme for release and rehabilitation of probationers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.