९१ हजारांचा झाला आॅनलाईन भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:57 IST2019-06-10T13:56:56+5:302019-06-10T13:57:48+5:30

महापालिका : आठवडाभरातील स्थिती

Fill an amount of 91 lakhs online | ९१ हजारांचा झाला आॅनलाईन भरणा

dhule

धुळे : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने गेल्या आठवडेभरापासुन विकासाचे एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे़ या अनुषंगाने नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा आता आॅनलाईन येत आहे़ आतापर्यत आठवडेभरात २४ नागरिकांना या प्रणाीलीचा वापर करून ९१ हजारांचा भरणा केला आहे़ महापालिकेच्या प्रत्येक विभागात होणाऱ्या आॅफलाईन कामकाजात अनेकदा गंभीर चुका निदर्शनास येतात़ त्यामुळे या चुका दूर करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेवर ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून भर दिला जात आहे़ सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्यास त्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल़
संकेत स्थाळावरून पावती उपलब्ध २०१२-१३ मध्ये करसंकलन विभागाचे रेकॉर्ड जळाल्यानंतर चाचपडत असलेल्या कर संकलन विभागास आता गतिमानता प्राप्त होणार आहे. संकेतस्थळामार्फत व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ही अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध करुन दिले जात असून यामुळे नागरिकांना कधीही आपली देयके तसेच भरणा केलेल्या देयकांच्या पावत्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे़
जनजागृतीचा अभाव
नागरिकांनी मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी यापुर्वी महापालिका करवसुली विभागातील कर्मचाºयाकडून घरोघरी जावुन कर वसली केली जात होती़ त्यानंतर महापालिकेच्या जुन्या इमारतीत कर भरण्याची कर भरल्याची पावती नागरिकांना दिली जात आहे़ मात्र गेल्या आठवड्याभरापासुन आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ मात्र जन जागृतीच्या अभावी नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद दिसुन येत नाही़
जळीतकांडाचीही भीती नाही़
वसुली विभागात जुलै २०११ मध्ये आग लाग लावण्यात आली होती, या घटनेत २००५ पर्यंतच्या माल मत्ताधारकांचा संपूर्ण डाटा जळून खाक झाला होता़ संगणकीकरणाचे काम अनेक दिवसांपासून हाती घेण्याचे नियोजन होते़ संगणकी करणाच्या अडचणीही उद्भविल्या़ परंतु अखेर हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यता राहणार नाही़ मात्र आठवड्याभरात २४ नागरिकांनी पहिल्यांदा या प्रणालीचा उपयोग करून करभरणा केला आहे़

Web Title: Fill an amount of 91 lakhs online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे