दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:19+5:302021-09-19T04:37:19+5:30
धुळे शहरात डेंग्यूमुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. यास सर्वस्वी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. अशा जबाबदार अधिकाऱ्यांवर ...

दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
धुळे शहरात डेंग्यूमुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. यास सर्वस्वी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. अशा जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
शहरातील डेंग्यू व मलेरियाचा बंदोस्त करण्यासाठी सातत्याने महापालिकेला निवेदन, वेळोवेळी आंदोलन, तसेच तोंडी व लेखी विनवण्याकरूनही महापालिका आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील वेद सूर्यवंशी या मुलाचा जीव डेंग्यूने गेला आहे. महापालिकेकडून कोट्यवधीचा निधी डास उत्पत्ती रोखण्यासाठी खर्च केल्याचा कागदावर दाखविले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या ठेक्यात प्रशासनातील काही अधिकारी, तसेच सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळ महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी केली आहे. निवेदनावर यावेळी धीरज पाटील, चंद्रकांत गुरव, नितीन शिरसाठ, देविदास लोणारी, सदाशिव पाटील, दिनेश पाटील, मोहित वाघ, रोहित अमृतकर, आदी उपस्थित होते.