त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:25+5:302021-06-19T04:24:25+5:30
सभेत कमलेश देवरे यांनी नातेसफाईचा मुद्दा मांडत त्यासाठी किती मनुष्यबळ वापरले, किती नाल्याची सफाई केली व किती खर्च केला ...

त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी
सभेत कमलेश देवरे यांनी नातेसफाईचा मुद्दा मांडत त्यासाठी किती मनुष्यबळ वापरले, किती नाल्याची सफाई केली व किती खर्च केला याची माहिती मागितली. तर शीतल नवले यांनीही नालेसफाई याेग्य पध्दतीने न झाल्याचे सांगितले. तर सहाय्य आराेग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी यासंदर्भात आराखडा तयार करून दहा कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून हे काम करण्यात आले. तसेच दाेन वर्षापूर्वी जेसीबी घेतल्यापासून नालेसफाईसाठी काेणत्याही प्रकारचा खर्च केला जात नसल्याचे सांगितले. तसेच पहिल्या पावसाळात पाणी साचलेल्या भागात सर्वेक्षण करून काम केले जात आहे. तर काटेरी झुडपे काढण्याचे काम बाकी असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. तर अमाेल मासुळे यांनी घंटागाडी, बंद पथदिव्यांचा मुद्दा मांडला. अनेकदा त्याबाबत तक्रारी करूनही काहीही उपयाेग हाेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
माेगलाई ते अवधान या भागासाठी एकच कर्मचारी पथदिव्याच्या देखभालीसाठी असल्याने ताे किती काम करेल याबाबत शंका उपस्थित केली. तसेच मिल परिसरातील सात काॅलनीत पथदिवे बंद आहेत. त्याबाबत तक्रार करूनही उपयाेग हाेत नाही काही ठिकाणी पाेलमध्ये वीजप्रवाह उतरत असल्याने नागरीकांच्या जीवाला धाेका असल्याने ते बदलण्याची मागणी नगरसेवक शीतल नवले यांनी केली.
सुनील बैसाणे, भारती माळी यांनी
भूमिगत गटार कामामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दाेन दिवसापूर्वी एक वृध्द पडून त्यांच्या डाेक्याला २२ टाके पडल्याचे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. याबाबत ठेकेदाराला माहिती कळविल्यानंतर ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी नगरसेवक कमलेश देवरे, सुनील बैसाणे, भारती माळी यांनी केली.
गैरप्रकाराबाबत कारवाई करा अन्यथा दालनात ठिय्या-सुनील बैसाणे
बेराेजगारांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय याेजना सुरू करण्यात आली आहे. त्यात दाेन वर्षांपूर्वी गैरप्रकार झाला. त्यासंदर्भात चाैकशी समिती नेमून संबंधितांना अहवाल देऊनही दाेषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करीत नगरसेवक सुनील बैसाणे यांनी सभेत केला. सभेत निर्णय न झाल्यास सभापतीच्या दालनात ठिय्या आंदाेलन बसू असा इशारा बैसाणे यांनी दिला. यावेळी गणेश गिरी व शिल्पा नाईक यांनी माहिती घेऊन पुढील सभेत माहिती दिली जाईल, असे सांगितले.
आमदार शाह यांचा सभेत निषेध.
भूमिगट गटारीच्या कामामुळे देवपुरातील रस्ते खराब झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी मनपाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र ह्या रस्त्याचा विषय आजच्या सभेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ.फारूख शाह यांनी तेथे भेट देऊन अधिकाऱ्यांना काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या आमदाराच्या कृतीचा निषेध सभेत सदस्यांनी केला.
माेकाट कुत्रे बंदाेबस्त करा
शहरात माेकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुत्र्यांच्या बंदाेबस्तासाठी डाॅग व्हॅनसह अन्य काेणत्या प्रकारच्या उपाययाेजना करता येतील यासंदर्भात सदस्यांनी उपाय सुचवावे. तसेच माेकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्याबाबत शासनाकडून परवानगी घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी अमाेल मासुळे, शीतल नवले, अमिन पटेल यांनी केली.