ॲट्राॅसिटी गुन्ह्यांचे दोषारोपपत्र त्वरित दाखल करा; दक्षता समितीला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:32+5:302021-09-24T04:42:32+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी दुपारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाजकल्याण ...

ॲट्राॅसिटी गुन्ह्यांचे दोषारोपपत्र त्वरित दाखल करा; दक्षता समितीला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी दुपारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर, पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकाडे, दिनकर पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा तपास विहित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यावर पीडितास या कायद्यान्वये मदत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस तपासावरील प्रलंबित गुन्हे, आर्थिक साहाय्य, मदत आणि पुनर्वसनाबाबतचा सविस्तर आढावा घेतला. सहायक आयुक्त बडगुजर यांनी आर्थिक साहाय्य, मदतीची माहिती दिली. तर पोलीस उपाधीक्षक कातकाडे यांनी पोलीस तपासावरील गुन्ह्यांची माहिती दिली.