दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:06+5:302021-04-05T04:32:06+5:30
एका गटाकडून वसीम अक्रम अन्सारी मोहम्मद असलम अन्सारी (३५, रा. मौलवीगंज, कलंदर चौक, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. ...

दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद
एका गटाकडून वसीम अक्रम अन्सारी मोहम्मद असलम अन्सारी (३५, रा. मौलवीगंज, कलंदर चौक, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दुचाकीवरुन घराकडे येत असताना गर्दी पाहून थांबल्यानंतर भांडणात यांचाही समावेश असल्याचे सांगत माझ्यासह मित्रावर हल्ला करण्यात आला. हाताबुक्क्यांनी मारहाण करीत लाथ मारल्याने दुचाकीवरुन आम्ही खाली पडलो. डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला. यावेळी खिशातील दुधाचे ३ ते ४ हजार रुपये व मित्राच्या खिशातील मोबाईल व ७ हजार रुपये रोख असा ऐवज गहाळ झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडला. याप्रकरणी आसीफ शहा, भोलू शहा, अल्तमाश शहा, अनास फिरोज शहा यांच्या विराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तर, दुसऱ्या गटाकडून आसीफ भोलू शाह (३८, रा. शहीद अब्दुल हमीद नगर, ८० फुटी रोड, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पैशांच्या कारणावरुन वाद करत शिवीगाळ करण्यात आली. हातातील चॉपरने छातीवर वार करण्यात आला. लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करण्यात आला. लोखंडी रॉडने मारुन दुखापतही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी समीर शाह उर्फ समीर मुल्ला, सलमान शाह, शम्सू (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य काही जणांविरुध्द विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही घटनांचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.