पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST2021-09-22T04:39:44+5:302021-09-22T04:39:44+5:30

शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी आणि व्यापारी यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही कागदावर दिसून येते. परिणामी वार्षिक कर हा त्यांच्या ...

Fight to fill the stomach, why should I pay taxes? | पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू?

पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू?

शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी आणि व्यापारी यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही कागदावर दिसून येते. परिणामी वार्षिक कर हा त्यांच्या माध्यमातून शासनाकडे जमा केला जातो. पण, सर्वसामान्य नागरिकांसह हातावर पोट भरणाऱ्यांनी काय करायचे, त्यांच्याकडून मिळविणारे उत्पन्न इतकेे कमी असते त्यांना पोट भरण्याची मारामार असताना ते नेमका किती टॅक्स भरतील आणि पोटाला काय करतील अशी स्थिती आहे.

आपण भरता का टॅक्स

- कामगार ऑटो : रिक्षा चालवून सामान्य जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यात पेट्रोलचे दर अधिक वाढून गेले आहेत. व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न आहे.

- चालक : वाहन चालवित असताना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न असतो. कमी पैशात संसाराचा रथ हाकलण्याची चिंता सर्वाधिक आहे.

- भाजीपाला विक्रेता : पावसाची अनियमितता त्यात भाज्यांचे वाढलेले दर लक्षात घेता रोजचा खर्च निघणे कठीण झालेले आहे.

- फेरीवाला : फेरीवाल्यांकडून लागलीच वस्तूंची खरेदी होतच असे नाही, वस्तू विकली गेली तर आमचे घर चालणार आहे.

- सिक्युरिटी गार्ड : मोठ्या मॉलसह उद्योजकांच्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असतो. मिळणारे उत्पन्न लक्षात घेता टॅक्स भरणार कसा?

- साफसफाई कामगार : नियमित स्वच्छता करत असताना आमचे उत्पन्न देखील तुटपुंजे असते. आमची पाेट भरण्याची मारामार आहे.

- सलून चालक : आमचे हातावर पोट आहे. टॅक्स भरण्यासारखे आमचे उत्पन्न देखील नाही. वाढणाऱ्या महागाईमुळे जीव मेटाकुटीला आला आहे.

- लॉन्ड्री चालक : सर्वच जण कपड्यांना इस्त्री करतात असे नाही. जे करतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांतून आमचा उदरनिर्वाह चालतो.

- घर कामगार करणाऱ्या महिला : घरोघरी जाऊन घरगुती काम करीत असलो तरी सर्वच ठिकाणी आम्हाला काम मिळतेच असे नाही. त्यातही मानधन हे कमीच असते.

- घर महिला : घर चालविणे आणि संसार सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला उत्पन्न नाही तर टॅक्स भरणार कोणता?

- वार्षिक ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कर भरावा लागत नाही. छोट्या व्यावसायिकांनी हिशोब मात्र ठेवायला हवा. आपले उत्पन्न किती याचे रेकाॅर्ड असायला हवे. गुंतवणूक करुन आयकर बचत करता येते. प्रत्येकाने पॅन कार्ड काढून घ्यायला हवे. उत्पन्न कमी असेल तर रिटर्न भरण्याची सुद्धा गरज नाही. प्रत्येकाने योग्य ती बचत केली पाहिजे.

श्रीराम देशपांडे, अर्थतज्ज्ञ

Web Title: Fight to fill the stomach, why should I pay taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.