पुलावरील तुटलेल्या कठडेमुळे अपघाताची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:55+5:302021-03-27T04:37:55+5:30
मागे काही दिवसांपूर्वी ट्रकच्या अपघाताने शिंदखेडा ते शिरपूर रस्त्यावर बुराई नदीवरिल पुलाचे कठडे तुटून दुरवस्था झाली आहे. या ...

पुलावरील तुटलेल्या कठडेमुळे अपघाताची भिती
मागे काही दिवसांपूर्वी ट्रकच्या अपघाताने शिंदखेडा ते शिरपूर रस्त्यावर बुराई नदीवरिल पुलाचे कठडे तुटून दुरवस्था झाली आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. तसेच शाळकरी मुले, पाटण गावातील नागरिकांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तुटलेल्या कठड्यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाला जाग येत नसल्याने चिंताजनक बाब असल्याचे उघड उघड दिसत आहे. पुलाचे कठडे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कारण लोकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात असून संबंधीत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. पुलावरील कठडे अभावी अपघात झाल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे व तात्काळ पुलाच्या कठडे दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे.