चिंचवार गावात पिता-पुत्राला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:29 IST2019-11-04T21:29:33+5:302019-11-04T21:29:57+5:30
हवा भरताना टायर फुटले : पाच जणांवर गुन्हा

चिंचवार गावात पिता-पुत्राला मारहाण
धुळे : टेम्पोमध्ये जादा हवा भरल्याने टायर फुटले या कारणावरुन दुकान मालकासह त्याच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना धुळे तालुक्यातील चिंचवार गावात घडली़ याप्रकरणी पाच जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
टेम्पो वाहनाच्या टायरचे पंक्चर काढले त्यावेळी दुकानदाराने टायरमध्ये जादा हवा भरली़ त्यामुळे टायर फुटला़ या कारणामुळे पाच जणांनी दुकानदाराला जाब विचारला़ शिवीगाळ करीत दुकानदाराला आणि त्याच्या मुलाला लाठ्या काठ्यांनी झोडपून काढले़ ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पंक्चर दुकानाचे मालक जगन्नाथ पांडूरंग पाटील (४०) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, चिंचवार गावात रविवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील मराठी शाळेजवळ ही घटना घडली़ त्यावेळी ईश्वर रामा पाटील, रावसाहेब ईश्वर पाटील, किरण ईश्वर पाटील, पंडीत रामा पाटील, संजय उत्तम पाटील या संशयितांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली़ जगन्नाथ पाटील यांचा मुलगा दिनेश पाटील (१७) यालाही हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ दगडही मारण्यात आला़
या हाणामारीमुळे पिता-पुत्राला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी पाचही संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस नाईक रमेश उघडे घटनेचा तपास करीत आहेत़