ट्रक-दुचाकी अपघातात पिता-पुत्री ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST2021-08-21T04:40:56+5:302021-08-21T04:40:56+5:30

सुका सुकदेव वळवी (३५, रा. धडगाव,जि. नंदुरबार) हा पत्नी व दोन मुलांसह आरावे (ता.शिंदखेडा) येथे कोमलसिंग गजेसिंग गिरासे यांच्या ...

Father and daughter killed in truck-bike accident | ट्रक-दुचाकी अपघातात पिता-पुत्री ठार

ट्रक-दुचाकी अपघातात पिता-पुत्री ठार

सुका सुकदेव वळवी (३५, रा. धडगाव,जि. नंदुरबार) हा पत्नी व दोन मुलांसह आरावे (ता.शिंदखेडा) येथे कोमलसिंग गजेसिंग गिरासे यांच्या शेतात राहतो. शेतमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो.

गुरुवारी (दि.१९) सुका वळवी हा पत्नी व दोन मुलांसह कामानिमित्त दुचाकीने दोंडाइचा येथे गेले होते. तेथून आरावे येथे परत येत असताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास चिमठाणे दोंडाईचा राज्य मार्गावर मेथी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने (क्र.एमएच०४- जीसी ३५६०) जोरदार धडक दिली. त्यात चारही जण गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांना शेतमालक गिरासे व ग्रामस्थांनी खासगी वाहनाने हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी ७.२५ वाजता सुका वळवी व त्याची मुलगी हिना यांना डॉक्टरांनी तपासून करून मृत घोषित केले. याबाबत कोमलसिंग गिरासे यांच्या माहितीवरून शहर पोलिसात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्याचे सुरू असून शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे अधिक तपास करत आहेत

Web Title: Father and daughter killed in truck-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.