धुळे : नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी दुधाळ गायी, म्हशीचे वाटप, शेळी, मेंढी यांचे गटवाटप, मासल कुकटपक्षी संगोपन करणे या योजनांकरिता आॅनलाइन अर्ज मागणविण्यात आले आहेत. सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील १८ वर्षांवरील अर्जदारांना ८ आॅगस्ट १९ पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. या योजनेची पूर्ण माहिती अर्ज करण्याची कार्यपद्धती तपशील महाबीएमएस या संकेतस्थळावर व गुगल स्टोअरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येईल. अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने आॅनलाइन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येत असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येणार आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकयांना मिळणार पुशपालनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:06 IST