थाळनेर परिसरात पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:47+5:302021-08-23T04:38:47+5:30
खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांच्या मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. मात्र, तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे खरिपातील पिके ...

थाळनेर परिसरात पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला
खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांच्या मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. मात्र, तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे खरिपातील पिके तग धरून उभी होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल होऊन वरुणराजाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहात होता. पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झालेला दिसून येत आहे.
परिसरात गेल्या एक महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पिकांची कोळपणी, निंदनी, कीटकनाशकाची फवारणी, यासोबत आंतरमशागतीची कामे पूर्ण झालेली होती.
कीटकनाशके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, परिसरात सुरू असलेले ढगाळ व दमट हवामानामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीस सुरुवात केल्याने औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झालेली दिसून येत आहे.