सामोडे येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2023 19:59 IST2023-04-24T19:58:44+5:302023-04-24T19:59:13+5:30
विशाल गांगुर्डे लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळनेर जि.धुळे: गेल्या आठवडाभरापासून वळवाच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. वळवाच्या पावसामुळे काढणीला आलेल्या ...

सामोडे येथे शेतकऱ्याची आत्महत्या
विशाल गांगुर्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर जि.धुळे: गेल्या आठवडाभरापासून वळवाच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. वळवाच्या पावसामुळे काढणीला आलेल्या शेतातील गहू व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे, शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी सामोडे (ता. साक्री) येथे घडली. सुनील दाजमल घरटे (वय ४७, रा. सामोडे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी सामोडे व पिंपळनेर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सामोडे येथील सुनील घरटे या शेतकऱ्याच्या शेतातील कांदे व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हे पीक काढणीवर आले होते. अक्षय तृतीया नंतर घरटे हे पीक काढणार होते. मात्र, तितक्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे सुनील घरटे यांच्या शेतातील दोन्ही पिके जमीनदोस्त झाली. कर्ज काढून या शेतकऱ्याने पीक लागवड केली होती. मात्र, वळवाच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहून सुनील घरटे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेनंतर परिवाराने परिवाराने मोठा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.