लाकडाऊन असल्यामुळे सर्वच व्यवहार थप्प झाले आहे. त्यात सर्वात जास्त फटका भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्याना बसत आहे. सौदाणे येथील शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली. पीक चांगले येऊन हातात दोन पैसे येतील, कर्ज फिटेल अशा शेतकऱ्यांनी विचार केला. लॅाकडाऊनपूर्वी शेतकरी टरबूज खरेदीसाठी येत होते. मात्र लॅाकडाऊन जाहीर होताच, अनेक व्यापाऱ्यांना येणे परवडत नाही. तसेच ते तीन ते चार रुपये दराने टरबुजाची मागणी करीत आहे. मात्र शेतकऱ्यांना बियाणे, औषधी फवारणी, मजुरी आदी खर्च जाता तीन ते चार रुपये दराने टरबूज देणे शक्य नाही. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना टरबूज न देता ते स्वत: गावोगावी जाऊन टरबुजाची विक्री करीत आहे. स्व विक्रीतून चांगला नफा मिळतो, असे अमोल सोनवणे या टरबूज विक्रेत्याने सांगितले.
शेतकऱ्यांना स्वत:च करावी लागतेय टरबुजांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST