विद्यापीठ संशोधात शेतकरी केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:22 IST2020-03-14T15:21:44+5:302020-03-14T15:22:09+5:30
शरद गडाख : कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कृषी विद्यापीठांचे संशोधन हे प्रामुख्याने शेतकरी केंद्रबिंदू मानून केलेले असते असे विचार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण तथा संशोधन विभागाचे संचालक डॉ़ शरद गडाख यांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले़
महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे आयोजित शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी डॉ़ गडाख बोलत होते़ याप्रसंगी धुळ्याच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ़ मिलींद अहिरे, राहुरी येथील डॉ़ यशवंत फुलपगारे, डॉ़ सुरेश दोडके, डॉ़ मुरलीधर महाजन, डॉ़ दिनेश नांद्रे, डॉ़ हेमंत पाटील, डॉ़ एस़ पी़ सोनवणे, डॉ़ रविंद्र भदाणे, वैभव सूर्यवंशी, श्रीराम पाटील, अॅड़ प्रकाश पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़
डॉ़ शरद गडाख म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सादर केलेली फळबाग, भाजीपाला, तृणधान्य, चारापिके यांची एकूण ६६ वाणांची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना पथदर्शक ठरतील़ कृषी विद्यापीठांचे संशोधन हे शेतकरी केंद्रस्थानी मानूनच केलेले असते़ तंत्रज्ञान हस्तांतरणात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका मोलाची ठरते़ ही केंद्रे शेतकऱ्यांची मंदिरे आहेत़ दुग्ध व्यवसायातील अर्थशास्त्र तसेच गो-पालनातून दुधा व्यतिरिक्त शेण, गोमुत्रं, शेणखत असे विविध घटकांचे आर्थिक गणित त्यांनी यावेळी समजून सांगितले़ शेतीमध्ये सुक्ष्मसिंचन, टेक्नॉलॉजी, यांत्रिकीकरणांचे महत्व आहे़