फवारणीचे औषध नाकातोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By अतुल जोशी | Updated: January 17, 2024 18:19 IST2024-01-17T18:18:35+5:302024-01-17T18:19:09+5:30
ज्ञानेश्वर पाटील हे शेतात फवारणीसाठी गेले होते.

फवारणीचे औषध नाकातोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे : शेतात फवारणी करीत असताना फवारणीचे विषारी औषध नाकातोंडात गेल्याने, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना, तालुक्यातील मोघण येथे मंळवारी दुपारी घडली. ज्ञानेश्वर महादू पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहाडीनगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.
ज्ञानेश्वर पाटील हे शेतात फवारणीसाठी गेले होते. फवारणी करीत असताना विषारी औषध त्यांच्या नाकातोंडात केले. त्यांना त्रास होऊ लागल्याने, त्यांनी तत्काळ पुतण्याला फोन करून विषारी औषध नाकातोंडात गेल्याने मळमळ,उलटी होत असल्याचे कळविले. पुतण्यासह भाऊ किशोर पाटील शेतात गेले. त्यांनी ज्ञानेश्वर पाटील यास वाहनात टाकून शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे डॅा. प्रकाश सुकळे यांनी तपासून ज्ञानेश्वर पाटील यास मृत घोषित केले. याप्रकरणी मोहाडीनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॅान्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत.