बोरीस येथे शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:06 IST2019-12-27T22:06:01+5:302019-12-27T22:06:37+5:30

शेतकरी दिन : बोरीसच्या ल्यूपिन फाऊंडेशन व कापूस पिक पद्धत शाखेचा उपक्रम

Farmers' Award honors at Boris | बोरीस येथे शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान

Dhule

कापडणे : धुळे तालुक्यातील बोरीस येथे २३ डिसेंबर रोजी जागतिक शेतकरी दिनानिमित्त येथ ल्युपिन फांऊडेशन अंतर्गत सुधारीत कापूस पिक पध्दत (बीसीआय) बोरीस शाखेकडुन शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमाप्रसंगी ‘बळीराजाचे प्रतिक बैलगाडी’चे पूजन करुन करण्यात आले. यावेळी शेतकरी दिन प्रसंगी भिलेसिंग गिरासे, मनोज भदाणे, कांतीलाल शिंपी, रघुनाथ पाटील, लोटन पाटील, मोरे, यांच्यासह लुपिन फॉऊडेशन जिल्ह्याचे अधिकारी अभंग जाधव, बोरीस किशोर बागुल, तसेच बोरीस परिसरात अन्य प्रगतीशिल शेतकऱ्यांचा कापूस पीक पद्धत व लुपिन फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
सुञसंचलान कृषीमित्र किरण बिरारीस, जागृती बैसाण यांनी केले. प्रस्तावना कृषीमित्र राहुल माळी यांनी केले.
आभार नरेंद्र देवरे व स्वप्निल देवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शेखर रोकडे, सचिन माळी, स्वप्निल पाटील, सुनीता पाटील, रेखा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विविध स्तरावरील मान्यवर व बोरीस परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सगभागी झाले होते.

Web Title: Farmers' Award honors at Boris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे