थाळनेरला विजेचा शॉक लागल्याने शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:36 IST2019-08-02T11:35:30+5:302019-08-02T11:36:00+5:30
गावात हळहळ : शेतात घडली घटना

थाळनेरला विजेचा शॉक लागल्याने शेतक-याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे शेतात विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकरी निलेश उर्फ बंटी नितीन पाटील (३४) याला जबर दुखापत झाली़ ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात घडली़ घटना लक्षात येताच आजुबाजूच्या शेतातील नागरीकांच्या मदतीने त्याला शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे थाळनेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़