कर्ले गावात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 21:19 IST2021-01-03T21:18:57+5:302021-01-03T21:19:15+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून केले कृत्य

कर्ले गावात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दोंडाईचा - शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील विश्वास रावजी पाटील या शेतकºयाने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून स्वत:च्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़
शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी विश्वास रावजी पाटील यांनी विकास सोसायटीचे कर्ज घेतले होते तसेच त्यांनी खरीप हंगामात आपल्या शेतात कांदे व कापूस ही पिके लावली होती़ कांद्याचे उत्पन्न आलेच नाही तर कापसावर बोंडअळीमुळे उत्पन्न देखील आलेच नाही़ शिवाय त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे त्याचा बोजा देखील वाढत होता़ याचा आलेला तणाव त्यांना सहन होऊ शकला नाही आणि त्यातून त्यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली़ ही घटना लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़