भामेर गावात शेतीच्या वादातून कुटुंबावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:33+5:302021-06-18T04:25:33+5:30
धुळे : साक्री तालुक्यातील भामेर गावात शेतीच्या बांधाच्या वादावरून जमावाने एका कुटुंबावर हल्ला चढवीत मारहाण केल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा ...

भामेर गावात शेतीच्या वादातून कुटुंबावर हल्ला
धुळे : साक्री तालुक्यातील भामेर गावात शेतीच्या बांधाच्या वादावरून जमावाने एका कुटुंबावर हल्ला चढवीत मारहाण केल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. १५) सायंकाळी ५.३० च्या सुमाराला शेताच्या बांधावर ही घटना घडली. जमावाने हातात काठ्या घेऊन लक्ष्मीबाई दंगल गवळे, त्यांचे पती, मुलगा प्रकाश आणि मुलगी चंद्रकला यांना मारहाण केली. शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लक्ष्मीबाई दंगल गवळे (वय ४५, रा. भामेर, ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश बुधा सोनवणे, जीवन बुधा सोनवणे, रामदास बुधा सोनवणे, चेतन रणधीर महाले, पवन रामदास सोनवणे, हिरकन उखडू सोनवणे, जयेश प्रकाश सोनवणे (सर्व रा. भामेर) यांच्याविरुद्ध बुधवारी (दि. १६) रात्री १०.५३ वाजता निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.