पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या निकालात होत आहे घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:46 IST2019-06-09T14:45:29+5:302019-06-09T14:46:04+5:30
धुळे जिल्हा । २०१५ पासून निकाल होतोय कमी, शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

dhule
धुळे : राज्य परीक्षा मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल २०१५ पासून दरवर्षी कमी-कमी होतो आहे. निकालात होणारी घसरण चिंतेचा विषय ठरू लागला आहे.
२०१५ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली होती. त्यासाठी २८ हजार ३३५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून २७ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याची टक्केवारी ९१.३६ टक्के होती.
मार्च २०१६ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी २८ हजार ७१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून २५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ९०.३६ होती.तर मार्च २०१७ मध्ये २८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८९.७९ टक्के होती. विशेष म्हणजे विभागात धुळे जिल्हा प्रथम होता.
२०१८ मध्ये ६३ केंद्रावर परीक्षा झाली. यासाठी २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८७.५१ टक्के एवढी होती. २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याची टक्केवारी ७७.११ एवढी आहे.
गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. जिल्ह्याने तिसऱ्या स्थानावरून दुसºया स्थानावर झेप घेतली आहे. मात्र टक्केवारी थोडी थोडकी नव्हे तर ८.४ टक्यांनी घट झालेली आहे. जिल्ह्याचा निकाल वाढण्यासाठी शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.