मला ठार मारण्याचा फडणवीस, रावलांचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:02 IST2018-08-06T13:59:55+5:302018-08-06T14:02:42+5:30

डॉ़ हेमंत देशमुख यांचा आरोप, मराठा आंदोलनामुळे दौरा रद्द

Fadnavis to assassin me, Raavala cut | मला ठार मारण्याचा फडणवीस, रावलांचा कट

मला ठार मारण्याचा फडणवीस, रावलांचा कट

ठळक मुद्दे-मराठा क्रांती मोर्चामुळेच मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द- आमच्या अटकेसाठी पोलीसांचा फौजफाटा पाठविला- डॉ़ देशमुखांना कारागृहात पाठविण्याचा सरकारचा कट

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोहयो आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचा मला ठार मारण्याचा प्रयत्न आहे, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री डॉ़ हेमंत देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला़ मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी दोंडाईचा दौरा रद्द केल्याचेही ते म्हणाले़
दोंडाईचा नगरपालिकेवर २००६ ते २०१६ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता होती़ २०१४ मध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४ कोटींचा  निधी आणला व इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण केले़ त्यामुळे आम्ही इमारतीचे उद्घाटन केले तर काय बिघडले? असा प्रश्न डॉ़ देशमुख यांनी उपस्थित केला़ तसेच केवळ इमारतीच्या उद्घाटनावरून आमच्यावर गुन्हे दाखल करून अटकेसाठी मध्यरात्री पोलीसांचा फौजफाटा पाठविला़ फेब्रुवारी महिन्यातही मुलीवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला़ केवळ या ना त्या कारणाने मला कारागृहात पाठवायचे व संपवायचे हा मुख्यमंत्री फडणवीस व रावल यांचा कट असल्याचेही डॉ़ देशमुख म्हणाले़ 

 

Web Title: Fadnavis to assassin me, Raavala cut