मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:15+5:302021-06-19T04:24:15+5:30
प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर शैक्षणिक वर्ष २०२० - २१चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष २०१९ - २० मधील ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर शैक्षणिक वर्ष २०२० - २१चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष २०१९ - २० मधील विद्यार्थ्यांचे पुन्हा अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२१पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी कळविले आहे.
धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयात २०२० - २१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र वर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबर २०२०पासून कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २०२० - २१ या शैक्षिणक वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रमाण वाढवावे. अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाची राहील. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. असेही समाजकल्याण आयुक्त बडगुजर यांनी म्हटले आहे.