शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल फॅक्टरीत स्फोट; १३ ठार ५८ जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 02:20 IST

५८ जखमी । मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

धुळे/शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी-बाळदे या गावाजवळील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात १३ जण ठार तर ५८ जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळी ९़४० वाजता सर्वात मोठा स्फोट झाल्यामुळे परिसरातील लोक घाबरून गेले. दुसरा स्फोट १०़१८ वाजता, तिसरा व चौथा स्फोट १०़२३ वाजता असे चार स्फोट झाले मात्र, ते लहान होते़ फॅक्टरीखालीला टाकीचा स्फोट होण्याच्या शक्यतेने वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ती शक्यता मावळल्याने ग्रामस्थ गावात परतले आहेत. मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी ११ जणांची ओळख पटली असून एकाची मात्र ओेळख पटलेली नाही. या घटनेत ५८ जण जखमी झाले आहेत. मयत मनोज कोळी कंपनीच्या आवारात होते. उरलेले मृत त्यावेळी कंपनीबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये असताना मरण पावले़ आग विझविण्यासाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतील महापालिका व नगरपालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले. स्फोटामागे घातपात तर नाही ना, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी एटीएसचे पथक पोहचले आहे. त्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात दुपारपर्यंत यश मिळाले. सर्व जखमींवर शिरपूर उपजिल्हा व धुळे जिल्हा रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. स्फोटीची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे तसेच जिल्हाधिकारी आदींनी तिथे भेट दिली.मृतांची नावे : पूनमचंद प्रल्हाद गुजर, उज्जैनसिंग राजपूत, मुकेश गोपाल माळी, मनोज सजान कोळी, किशोर मुरलीधर शेवलेकर, पिनाबाई जितेंद्र पावरा, रोनशी जितेंद्र पावरा, सुनिताबाई उर्फ पंजाबाई विशाल पावरा, प्रिया उर्फ प्रियंका सुभाष पावरा, सुबीबाई उर्फ प्रमिला रमेश पावरा, सुपीबाई रमेश पावरा ही मृतांची नावे आहेत. धुळे येथे ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले़स्फोटांच्या मुळाशी‘इझ आॅफ डुइंग बिझनेस’कारखान्यांमधील स्फोटांच्या संख्येत वाढ झाली असून त्याच्या मुळाशी सरकारच्या ‘इझ आॅफ डुईंग बिझनेस’चा अतिरेक असल्याचे समोर येत आहे. शनिवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर ही बाब आणखीच अधोरेखित झाली आहे.

टॅग्स :DhuleधुळेChief Ministerमुख्यमंत्रीDeathमृत्यू