मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना ९ लाखांची खर्चमर्यादा, खर्चावर प्रशासनाचा 'वॉच' राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:45 IST2025-12-22T12:45:05+5:302025-12-22T12:45:17+5:30
उमेदवारांच्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना ९ लाखांची खर्चमर्यादा, खर्चावर प्रशासनाचा 'वॉच' राहणार
Dhule Municipal Corporation elections: धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 'ड' वर्ग महानगरपालिका असल्याने निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९ लाख रुपयांपर्यंत खर्च निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या घोषणेनंतर आता सर्वांचे लक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे लागले आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी दाखल अर्ज करतांना उमेदवाराला राखीव प्रवर्ग (एससी, एसटी, ओबीसी व महिला): २,५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
उमेदवारांच्या खर्चावर मनपा प्रशासनाचा 'वॉच' राहणार
उमेदवारांच्या खर्चाचे 'मीटर' अर्ज भरल्याच्या दिवसापासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. तोपर्यंत बैठका आणि जनसंपर्क याद्वारे प्रचाराचे नियोजन केले जात आहे. खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण: निवडणुकीचे कामकाज सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सत्रात निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगण्यात आले.
२३ तारखेपासून प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, सद्यःस्थितीत इच्छुकांसाठी अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. उमेदवारी अर्ज ऑन लाईन भरावे लागणार आहे. ३० डिसेंबर उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.