भगवान झुलेलाल शोभायात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:03 IST2019-04-07T12:03:35+5:302019-04-07T12:03:51+5:30

सिंधी दिवस : रक्तदानासह विविध कार्यक्रम

In the excitement of Lord Jhalalal Shobayatra | भगवान झुलेलाल शोभायात्रा उत्साहात

dhule

धुळे : साक्रीरोडवरील भगवान झुलेलाल मंदिरात झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे़ यावेळी प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती़
सिंधी दिवसानिमित्त सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले होते़ यावेळी १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते़ तर दुपारच्या सत्रात भाविकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले़ सायंकाळी भगवान झुलेलाल यांची महाआरती झाल्यानंतर शहरातुन भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली होती़ यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, भगवान झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष प्रकाश छेतिया, सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष गुलशन उदासी, नगरसेवक हर्षकुमार रेलन, नगरसेविका कशिश उदासी, नोतन मिरचंदाणी, देवानंद नानकाणी, किशोर लुंड, सिरीचंद छेतिया, डॉ. संतोष खत्री, किशोर डियालाणी, सुरेश कुंदनाणी, सुरेश दंडवाणी, संतोष दोदाणी उपस्थित होते. झुलेलाल मंदिरापासुन झुलेलाल सोसायटी, गुरुनानक सोसायटी परिसरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली़ रात्री ९.३० वाजता शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले़

Web Title: In the excitement of Lord Jhalalal Shobayatra

टॅग्स :Dhuleधुळे