दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 22:47 IST2020-02-20T22:47:08+5:302020-02-20T22:47:30+5:30
चितळे माध्यमिक : शिक्षक अभिजीत जोशी यांना पुरस्कार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील रा़ के़ चितळे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते़ बोर्डाच्या परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले़
जयहिंद शाळेचे शिक्षक व्ही़ टी़ गवळे यांनी मराठी विषयाचे मार्गदर्शन केले़ तसेच एस़ पी़ कुलकर्णी, सी़ आऱ देसले, व्ही़ एस़ बोरकर, एऩ एम़ जोशी, एऩ यु़ बागुल, एस़ टी़ पाटील, एच़ डी़ दराडे, एस़ एस़ गावीत, जे़ जे़ जोशी या शिक्षकांनी आपआपल्या विषयांचे मार्गदर्शन केले़
यावेळी मुख्याध्यापक बी़ के़ नेरकर यांनी देखील मार्गदर्शन केले़ यावेळी व्ही़ एऩ हलकारे, जे़ जे़ जोशी उपस्थित होते़
विद्यार्थ्यांना निरोप
शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापकांनी पेपर लेखनाविषयी मार्गदर्शन केले़ विद्यार्थ्यांना अल्होपहार देवून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला़ एऩ यु़ बागुल, डी़ एस़ रुद्र, एस़ पी़ कुलकर्णी, व्ही़ व्ही़ जोशी या शिक्षकांनीही मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या़
अभिजीत जोशींना पुरस्कार
शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विस्तार सेवा केंद्रातर्फे आयोजित माध्यमिक शिक्षकांसाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आशय सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे शिक्षक अभिजीत बाळकृष्ण जोशी यांना प्रतिष्ठेचा कै़ प्रा़ व़ ग़ हजरनीस पुरस्कार मिळाला आहे़
संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, कैलास अग्रवाल, संतोष अग्रवाल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणापत्र प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला़ गेल्या वर्षी देखील हा पुरस्कार याच शाळेचे शिक्षक नंदकिशोर बागूल यांना मिळाला होता़ मुख्याध्यापक बी़ के़ नेरकर, पर्यवेक्षक व्ही़ एऩ हलकारे यांच्यासह सर्व शिक्षकांनी जोशी यांचे अभिनंदन केले़