संचारबंदीच्या काळातही वाडीत दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST2021-03-29T04:21:58+5:302021-03-29T04:21:58+5:30
दि. २५ मार्चच्या शासन आदेशानुसार ज्या-त्या गावातील ग्रामविकास अधिकारी, सरपंच व पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवेतील ...

संचारबंदीच्या काळातही वाडीत दुकाने सुरू
दि. २५ मार्चच्या शासन आदेशानुसार ज्या-त्या गावातील ग्रामविकास अधिकारी, सरपंच व पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. असे असले तरीदेखील काही दुकानदार आपली मनमानी करून दुकाने सुरू करतात. यावर वाॅच म्हणून गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांना कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
वाडी गावात कोरोनाने जोरदार मुसंडी मारली. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर आणि कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांमार्फत देण्यात आलेले आहेत. तरी वाडी गावात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात येत नाही, परंतु ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत, अशा दुकानदारांतर्फे कायद्याचा भंग केला जात आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.