कापडणे येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:59 IST2019-05-10T11:58:41+5:302019-05-10T11:59:15+5:30
सर्वानुमते कार्यकारिणी : ज्येष्ठांची मोठी उपस्थिती

dhule
कापडणे : येथील झेंडा चौकातील श्री गुरुदत्त मंदिरात मंगळवार ७ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघ कापडणेची स्थापना करण्यात आली व सर्वानुमते कार्यकारी मंडळाची निवडही करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अभय कॉलेज तथा सचिव फेस्कॉम खानदेश प्रादेशिक विभागाचे बी.एन. पाटील तर प्रमुख पाहुणे अग्रसेन जेष्ठ नागरिक संघाचे जगदीश झांझरिया, शिवाजीराव पवार, बी.के. सनेर, सी.डी. ठाकरे, शांताराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघ कापडण्याच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक तथा योगशिक्षक दिनकर कौतिक पाटील तर उपाध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य विश्वासराव आत्माराम देसले, सचिव मुरलीधर पितांबर जगदाळे, कोषाध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील, सदस्य दगाजी भिवसन कुंभार, आर.पी. पाटील, साहेबराव राजाराम पाटील, रवींद्र रंगराव पाटील, नथू काशिनाथ सोनार आदींची कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
कार्यक्रमात बी.एन. पाटील, जगदीश झांजरिया, शिवाजीराव पवार, सी.डी. ठाकरे, रघुनाथ पुंडलीक बोरस आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना व आभार सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास आत्माराम देसले यांनी केले. याप्रसंगी आत्माराम पाटील ,राजेंद्र पाटील, दिनकर पाटील, बन्सीलाल पाटील, डी.के. वाणी, राजधर पाटील ,दगाजी मोरे, बाबूलाल पाटील, किरण पाटील, बालू पाटील, सुभाष पाटीला आदी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.