शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कानुबाई मातेची थाटात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:29 IST

विविध ठिकाणी उत्सव : रात्रभर जागरण व विविध कार्यक्रमांचे आयोजन आज होणार विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/मालपुर: खान्देशवासीयांचे आराध्य कुलदैवत असलेला  कानुबाई मातेची शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ठिकठिकाणी थाटात स्थापना करण्यात आली. या उत्सवासाठी सर्व भाऊबंदकीचे  नातेवाईक हे एकत्र येत असतात.    कानुबाई मातेचा उत्सव संपूर्ण खान्देशात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो़ एकत्र कुटुंब पध्दत काळाच्या ओघाने लोप पावत असली तरी या सणाला सारे भाऊबंद नातलग  आनंदाने परिवारासह एकत्र येत असतात हे या उत्सवाचे वैशिष्टच म्हणावे लागेल़* अशी करतात स्थापना *केळीच्या खांबाने मखर सुशोभित करून चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा-नाणे टाकून व सजवून त्यावर पारंपारीक नारळ ठेवून देवीचा शृंगार केला जातो़ अलंकारांनी सजवून देचील प्रिय असलेली फुले अर्पण करतात़ दुपारी विधीवत स्थापन करून सायंकाळी महानैवेद्य अर्पण करतात़ रोट-पोळी, गंगाफळाची भाजी, खीर अस    नैवेद्य कानुबाईला अर्पण केला जातो़ साखर, फुटाणे, लाह्या, काकडीच्या प्रसादाला महत्व  आहे़. महाआरती करून सायंकाळी  सर्व कुटुंबिय एकत्र प्रसाद ग्रहण करतात़ रात्री झिम्मा, फुगड्या, जागरण, गीत भजनाचा कार्यक्रम होतात़ दुसºया दिवशी  सामूहिकरित्या वाजत गाजत  जल्लोषात  कानुबाईचे विसर्जन करण्याची परंपरा आजही टिकून आहे़ शहरात पांझरा नदी पात्रात विर्सजन करण्यात  येत   असते.*मालपुर येथे ही थाटात स्थापना आज सामूहिक विर्सजन*मालपुर येथे  सकाळ पासुनच कानुबाई मातेच्या मातेचे स्थापना करण्याची लगबग दिसून आली़ संततधार पावसासह कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालायावेळी कानुबाई माता व कन्हेर राजाच्या घोषणांनी संपूर्ण गावच दणाणून गेले. रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ कानुबाई मातेच्या दर्शनासाठी घरोघरी फिरतांना दिसुन आली. यावेळी सगळेच अहिराणी, मराठी गाण्यांचा वेगवेगळ्या वाद्याचा गजर करतांना दिसुन आले. संपूर्ण रात्र  जागरण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले़आज सोमवारी सकाळी ९ वाजेपासुन विसर्जन मिरवणूकिला शनिमंदिर पासुन होणार सुरुवात. होणार असून संपूर्ण गावातून मिरवणूकी नतंर अमरावती नदीच्या संगमेश्वरा जवळ सामुहिक विसर्जन होणार आहे .

टॅग्स :Dhuleधुळे