शहरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यास ऊर्जामंत्र्यांनी दिली मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:43+5:302021-06-24T04:24:43+5:30
धुळे - शहर मतदारसंघातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्याच अनुषंगाने विद्युत ...

शहरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यास ऊर्जामंत्र्यांनी दिली मान्यता
धुळे - शहर मतदारसंघातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्याच अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीची हानी कमी करण्यासाठी धुळे शहरातील उपरी तारमार्ग वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी मुंबईत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन केली होती. मंत्र्यांनी यास होकार देत यावर लवकर निर्णय देऊ, असे आश्वासन आमदारांना दिले.
भूमिगत विद्युत वाहिनीचे काम नाशिक, गोंदिया, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये झालेली आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी नवीन उच्चदाब केंद्र स्थापित करणे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढविण्यासाठी संचालक (प्रकल्प) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना धुळे शहरातील चार भाग करून टप्प्याटप्प्याने मंजूर करून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश करावे आणि याकरिता आवश्यक निधीची तरतूद करावी,
अशा आशयाचे निवेदन आमदार फारूक शाह यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेत बुधवारी सादर केले. या स्तुत्य उपक्रमावर यशस्वी चर्चा होऊन लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आमदार शाह यांना दिले आहे. वरील काम पूर्णत्वास आल्यास धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल आणि वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.