भरधाव ट्रकच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 20:04 IST2018-04-01T20:04:43+5:302018-04-01T20:04:43+5:30

बाभळे फाटा : शेलारवाडीत शोककळा

The end of two-wheelers in the truck | भरधाव ट्रकच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा अंत

भरधाव ट्रकच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा अंत

ठळक मुद्देबाभळे फाट्याजवळ अपघात भरधाव ट्रकने दुचाकीला उडविलेधुळ्यातील शेलारवाडीत शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली़ यात जखमी झालेले अर्जुन पारखे (५३) यांचा मृत्यू झाला़ ही घटना बाभळे फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली़ 
शहरातील चितोड रोड वरील शेलारवाडीत राहणारे अर्जुन पांडूरंग पारखे (५३) हे सेट्रींगचे काम करतात़ काहीतरी कामानिमित्त ते दुचाकीने धुळ्याकडून नरडाणा एमआयडीसी येथे जात होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली़ अपघाताची ही घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास डॉ़ तुषार पवार यांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी अर्जुन यांचे भाऊ दत्तू पांडूरंग पारखे (५५) यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अर्जुन पारखे यांच्या पश्चात २ भाऊ, २ बहिणी, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे़ त्यांच्यावर धुळ्यात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़

Web Title: The end of two-wheelers in the truck