खिचडी प्रॅक्टीस विरोधात इमा डॉक्टरांचे धुळ्यात आयएमएसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:41 IST2021-02-02T22:41:05+5:302021-02-02T22:41:37+5:30

शासनाने आयुर्वेदाच्या प्रगतीच्या दृष्ट्रीने हा निर्णय रद्द करण्याची मागणी

Emma Doctor's agitation in front of IMS in Dhule against Khichdi practice | खिचडी प्रॅक्टीस विरोधात इमा डॉक्टरांचे धुळ्यात आयएमएसमोर आंदोलन

खिचडी प्रॅक्टीस विरोधात इमा डॉक्टरांचे धुळ्यात आयएमएसमोर आंदोलन

धुळे : खिचडी प्रॅक्टीस विरोधात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आयएमए हॉलबाहेर आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडीसीन या आयुवेर्दीक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने भारताच्या राजपत्रात प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार आयुवेर्दीक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एक अतिशय प्राचीन शास्त्र म्हणून त्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्या क्षेत्रातील तज्ञांनी त्यांचे शास्त्र सोडून आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास आमचा विरोध आहे. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक शास्त्र यात मोठा फरक आहे. त्यामुळे सीसीआयएम करुन नमूद करण्यात आलेल्या सुचनांचा आम्ही विरोध करतो.
शासनाने आयुर्वेदाच्या प्रगतीच्या दृष्ट्रीने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आयएमएचे अध्यक्ष डॉ. जया दिघे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव डॉ. महेश अहिरराव, विशाल पाटील, संजय जोशी, अभय कुलकर्णी यांनी केली.

Web Title: Emma Doctor's agitation in front of IMS in Dhule against Khichdi practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे