शिरपूर, शिंदखेड्यात शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:34 IST2020-12-13T21:32:21+5:302020-12-13T21:34:17+5:30

पेट्रोल दरवाढीला विरोध : दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

Elgar of Shiv Sena in Shirpur, Shindkheda | शिरपूर, शिंदखेड्यात शिवसेनेचा एल्गार

dhule

धुळे :  पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या प्रचंड वाढलेल्या किंमती, त्यामुळे होणारी प्रचंड महागाई तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे  केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवून आंदोलन केले. यावेळी मोटरसायकल-सिलेंडर यांची प्रतिकात्मक मिरवणूक काढली. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा दहन केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस कच्च्या तेलाचे भाव कमी होत असतांना व कोविडच्या परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर, कामगार, नोकरदार, व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असतांना जिवन कसे जगावे? या विवंचनेत सर्व सामान्य असतांना केंद्रातील मोदी सरकार दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवित आहे.
पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. भविष्यात शंभरी पार करेल. डिझेलच्या दराने ऐंशीचा टप्पा गाठला आहे. केंद्राने घरगुती गॅसची सबसिडी रद्द केली असून भाव देखीन दिवसेंदिवस वाढत आहेत. या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप असुन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात. तसेच शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे विधान केले आहे.  त्यांची मंत्री पदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. 
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, छोटू पाटील, भाईदास पाटील, डॉ. मनोज पाटील, सर्जेराव पाटील, विनायक पवार, सागर देसले, गणेश परदेशी, प्रदीप पवार, विजय सिसोदे, हिरालाल बोरसे, नंदकिशोर पाटील, विश्वनाथ पाटील, संतोष पाटील, डॉ. भरत राजपुत, डॉ. हितेश वाडीले, विरपाल गिरासे, चेतन राजपुत, शैलेश सोनार, राकाशेठ रुपचंदाणी, दिपक मराठे, नितीन माळी, एस. डी. पाटील, अमृत भामरे, आर. आर. पाटील, एम. एस. जाधव, धनसिंग वसावे, शाम सोनवणे, प्रकाश साळुंके, भटू पाटील, विक्की पाटील, रविंद्र कोळी, सचिन पाटील, गणेश पाटील, सुकदेव बागुल यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिरपूरला गाडी लोटो आंदोलनाने वेधले लक्ष
धुळे : लॉकडाऊन लागू झाल्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी गाडी लोटो आंदोलन केले. यावेळी दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसोबतच केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पाच कंदिल चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर गाडी लोटो आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आले़ यावेळी सेनेचे उपजिल्हा प्रमुख  भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभा जोगराणा, एसटी सेनेचे जिल्हाध्यक्ष रजेसिंग राजपूत, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटुसिंग राजपूत, शहराध्यक्ष मनोज धनगर, अत्तरसिंग पावरा, तालुका प्रमुख दिपक चोरमले, तालुका संघटक, योगेश सूर्यवंशी, प्रेमकुमार चौधरी, बंटी लांडगे, योगेश ठाकरे, विकास महिरराव, सुनिल सुर्यवंशी, देवा  पाटील, अमोल पाटील, गोलू मराठे, दिनेश गुरव, नितीन सोनार, बळीराम बंजारा, योगेश शिंपी, संजय देवरे, पिंटू शिंदे, जितेंद्र पाटील, इंद्रिस शहा, शाकिर कुरेशी, सागर निगवाडे, दिपक धनगर, बाप्पू पावरा  तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़.

Web Title: Elgar of Shiv Sena in Shirpur, Shindkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे