अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राथमिक शिक्षिका जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:37 PM2019-04-28T12:37:06+5:302019-04-28T12:37:30+5:30

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग : संतप्त नागरीकांना महामार्गच खोदला

Eleven teachers killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राथमिक शिक्षिका जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राथमिक शिक्षिका जागीच ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्री शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने प्राथमिक शिक्षिका भावना पाटील या जागीच मरण पावल्या आहेत़ या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रात्री महामार्ग रोखून धरला होता़ यामुळे सुरतकडे व धुळेकडे जाणाºया मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती़ यावेळेस संतप्त नागरिकांनी महामार्ग खोदून आपला निषेध व्यक्त केला आहे़ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह साक्रीच्या  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला़ या दु:खदायी घटनेमुळे शहरात एकच शोककळा पसरली आहे. 
भावना अविनाश पाटील या सुरपान येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या़ त्यांचे पती अविनाश पाटील हे दहीवेल येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत़ भावना पाटील या महामार्ग लगत असलेल्या श्रीरंग कॉलनीतून रात्रीच्या सुमारास महामार्गावर फिरण्यासाठी गेल्या होत्या़ त्यावेळेस आयटीआय साक्रीच्या गेटसमोर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या वेळेस त्यांचे शरीराचे तुकडे इतरत्र पसरले होते़ अपघात झाल्यानंतर बºयाच वेळपर्यंत त्यांची ओळख पटत नव्हती़ रस्त्याच्या कडेला त्यांचा मोबाईल पडलेला होता़ त्या मोबाईल वरून त्यांची ओळख पटली़ त्यांनी शेवटचा फोन आपले पती अविनाश पाटील यांना केला होता़ अविनाश पाटील हे पुणे येथे मुलीच्या परीक्षेच्या निमित्ताने गेले होते़ तर त्यांची मुलगीही नाशिक येथे परीक्षेसाठी गेली होती़ दोघे मुलगी व वडील हे रात्री नाशिकहुन परत येत असतानाच प्रवासात त्यांना या अपघाताची माहिती कळविण्यात आली़ त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला़  अपघात झाल्यानंतर महामार्गावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती़ ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण रस्ता आहे़ रस्त्याच्या कडेला असलेले लिंबाचे झाड असल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़

Web Title: Eleven teachers killed in an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.