विजेचे प्रश्न तातडीने सोडवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:09+5:302021-07-14T04:41:09+5:30
आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित ...

विजेचे प्रश्न तातडीने सोडवावेत
आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित केली होती, त्यात वरील सूचना दिल्या.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वारंवार विजेचे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे शेती उत्पन्नाचे नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सुटावेत म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गतिशीलता वाढवावी. धुळे तालुक्यात मंजूर असलेल्या ५० नवीन ट्रान्स्फाॅर्मरची माहिती देण्याच्या सूचना आ.पाटील यांनी केल्या, त्यानुसार कार्यकारी अभियंता डी.डी.भामरे यांनी सांगितले की, ५० ट्रान्स्फाॅर्मर प्राप्त झाले असून त्यापैकी काही ट्रान्स्फाॅर्मर बसविण्यात आले आहेत.तर उर्वरित अतिरिक्त विजेचा दाब आहे त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर ट्रान्स्फाॅर्मर व स्ट्रीट लाईटची कामांची त्वरित निविदा काढून प्राधान्याने कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या.तसेच ओ.टी.एस.योजनेंतर्गत आदिवासी वस्तीतील वीजपुरठ्याच्या कामांची निविदा काढून सदर कामे तत्काळ सुरु करण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी नवीन ट्रान्स्फाॅर्मर तसेच विजेचे पोल बसविण्याची मागणी केली. बाबरे येथे आदिवासी वस्ती अंधारात होती म्हणून तेथे वीजपुरवठा व्हावा म्हणून एकूण १५ लक्ष ९४ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम लवकरच सुरु होईल.बैठकीला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत ग्रामीणचे विभागीय कार्यकारी अभियंता डी.डी. भामरे, कार्यकारी अभियंता एन.बी. गांगो, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हाटकर,कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्री चेअरमन लहू पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील, योगेश चव्हाण, उपकार्यकारी अभियंता, आर. एस. खिरवाडकर,रितेश पाटील, साहेबराव खैरनार, पंढरीनाथ पाटील, के.डी.पाटील, संतोष राजपूत, सोमनाथ बागुल, नेर सरपंच गायत्री जयस्वाल,शशिकांत रवंदळे,सागर पाटील, संदीप पाटील, प्रल्हाद मराठे आदी उपस्थित होते.