संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:51+5:302021-02-11T04:37:51+5:30
नेर - -- येथील लोणखेडी २५ अ शिवारातील डीपी गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळून गेल्याने शेतकऱ्यांनी तक्रार करूनही ...

संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या
नेर - -- येथील लोणखेडी २५ अ शिवारातील डीपी गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळून गेल्याने शेतकऱ्यांनी तक्रार करूनही महावितरणकडून ती बसवण्यात येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना पाणी देता येत नसल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती होती.. नेर येथील महावितरणच्या कार्यालयात रोज चकरा मारूनही आज येईल, उद्या येईल, असे उत्तरे देऊन बोळवण करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज बुधवारी पुन्हा महावितरणच्या कार्यालयात येऊन निदर्शने केल्याने अखेर अधिकाऱ्यांनी डीपी बसवली.
येथील डीपीवरून परिसरात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा केला जातो. केल्या चार ते पाच दिवसांपसून या डीपीत शॉर्ट सर्किट होऊन ती जळाली होती. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी देता येत नव्हते. त्यामुळे पिकांना ताण पडत होता. पर्यायने महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नातही मोठा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार डीपी बसवण्याची मागणी केली. या वेळी वीज अभियंत्यांनी शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यासाठी वेठीस धरले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वीजबिले भरूनही डीपी बसवण्यात आली नाही. आज, उद्या करीत वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी थेट नेर येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन धडक दिली. या वेळी डीपी बसवण्याची मागणी करून निर्दशने केली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना पाहून अखेर अधिकाऱ्यांनी डीपी आणून ती बसवली. या वेळी रावसाहेब खलाणे,पजू अहिरे, योगेश बागूल, बाजीराव माळी,पंडित माळी,रामभाऊ माळी,लोटन माळी,आसाराम माळी,सीताराम पाटील, शोभाबाई अहिरे,तुकाराम खलाणे, सिंधुबाई माळी, मंगलबाई माळी, एकनाथ पाटील, अर्जुन माळी, आनंदा पाटील,माधव पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.