निवडणूक वाॅर्डाची... गप्पा मात्र राज्याच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:34+5:302021-01-13T05:33:34+5:30

चहा, नाश्ता विक्रेत्यांना सुगीचे दिवस... ग्रामपंचायत निवडणुकीत आता रंग भरू लगला आहे. मात्र गाव चौकात गप्पांचे फड रंगू ...

Election ward ... chat but state | निवडणूक वाॅर्डाची... गप्पा मात्र राज्याच्या

निवडणूक वाॅर्डाची... गप्पा मात्र राज्याच्या

चहा, नाश्ता विक्रेत्यांना सुगीचे दिवस...

ग्रामपंचायत निवडणुकीत आता रंग भरू लगला आहे. मात्र गाव चौकात गप्पांचे फड रंगू लागलेले आहे. मोठ्या गावात बसस्टँडजवळच चहा, नाश्ता विक्रेत्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. निवडणुकीनिमित्त इच्छुक उमेदवारांच्या अवतीभोवती समर्थकांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. या समर्थकांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था संभाव्य उमेवारांनाच करावी लागते. त्यामुळे सकाळी सकाळी चहा, नाश्ता होत असल्याने, अनेक जण आपणच कसे तुमचे निष्ठावान आहोत हे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे करीत असल्यामुळे चहा, नाश्ता विक्रेत्यांचा फायदा होत असून, कोरोनामुळे झळ बसलेल्या या विक्रेत्यांना काही दिवस का असेना सुगीचे दिवस आले आहे. त्यांचा व्यवसाय वाढलेला असून, त्यातून त्यांना पैसेही मिळू लागले आहेत. मात्र विक्रेतेही हुशार झालेले आहेत. निवडणुकीची त्यांनाही कल्पना असल्याने ते ‘कल उधार, आज नगद’या तत्त्वाचा

मागच्या वेळचा अगोदर हिशोब द्या

ग्रामपंचायतीसाठी आता वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांसह त्याचे समर्थकही प्रभागात सारखे फिरताना दिसत आहे. लक्ष नसलेल्यांनाही आवर्जुन रामराम करीत आहेत. शिंदखेडा तालुक्यातील गावात असाच एक विद्यमान सदस्य गावात फिरत हाेता. या निवडणुकीत आपण विकासालाच प्राधान्य देणार असे चारचौघांमध्ये सांगत होता. त्याचे समर्थक हे सर्व निमूटपणे ऐकत होते. मात्र त्याच ठिकाणी चहा पिण्यासाठी आलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याची फुशारकी काही पटली नाही. तो थेट त्या सदस्याजवळ गेला अन म्हणाला... तात्या तू निवडणूक लढवतोय, ते चांगले आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र गेल्यावेळी आपल्या वाॅर्डासाठी..गावासाठी काय केले हे सांगायला विसरू नको. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या या सल्ल्याने त्या सदस्याची बोलती बंद झाली. कारण त्याने काहीच कामे केली नव्हती. आता लोक हिशोब विचारायला लागले आहेत, याची जाणीव त्याला झाल्याने त्यानेही त्या ठिकाणाहून काढता पाय घेणे पसंत केले.

Web Title: Election ward ... chat but state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.