लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : विद्यार्थी हा शालेय जीवनापासूनच परिपूर्ण व्हावा, त्याचा शैक्षणिक पाया मजबूत करतांना त्याला भारतीय लोकशाहीतील एक स्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व्हावी़ भविष्यात निवडूणकीला मतदान करावे लागणार असून त्यासाठी जनजागृती करण्याची गरजच भासणार नाही, म्हणून बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात मुलींना निवडणूकीचे धडे देण्यात आले़बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात शालेय मंत्रीमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. भारतात लोकशाही असून ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक मतदान पद्धतीने निर्भय वातावरणात, निरपेक्षपणे घेण्यात येते. शाळेत देखील प्रत्येक वर्गात मंत्रीमंडळ असते. त्यात वेगवेगळे मंत्री असुन मुख्यमंत्री पद देखील असते. मतदान पेटीचा उपयोग करून विद्यालयातील सर्व मुलींनी मतदानाचा आनंद घेतला.शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया म्हणजे काय? आपला उमेदवार आपण कसा निवडतो? प्रचार यंत्रणा कशी राबविली जाते? अगदी निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापासून ते शेवटी निकाल जाहिर होण्यापर्यंतची ही प्रक्रिया मुलींना समजावी व भारताचे आदर्श नागरीक यातून घडावेत यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घेतल्याचे शाळाप्रमुख कल्पना पाटील यांनी सांगितले़विशेष म्हणजे या निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी प्रसिध्द करणे, मतपत्रिका छापणे, मतदान विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून प्रचार करणे, निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवड करणे, मतदान केंद्रात आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे, अगदी बोटाला निळी शाई लावण्यापासून ते मतपेटीत मतदान केलेली मतपत्रिका घडी करून टाकण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया मुलींनी अनुभवली़ या निवडणूकीचे विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली, एकही मतपत्रिका यात बाद गेलेली नाही़ यावेळी शाखाप्रमुख कल्पना पाटील, पंकज चव्हाण, सी.एस. बडगुजर, पर्यवेक्षक एन. एम. सोनवणे, रोहिणी रंधे, गणेश भामरे, बी. एन. ठाकरे, पी. आर. चव्हाण, जे. पी. पावरा, टी. टी. ढोले, वैशाली पवार, एस. ए. अहीरे, डी. जे. चव्हाण, निरज निकम, भावना भामरे, सुरेखा मालचे, मधुकर सोनवणे, राजेंद्र गिरासे, भिमराव धनगर, सचिन पवार उपस्थित होते.शालेश स्वराज्य सभा निवडणूक २०१९-२० या निवडणूक प्रक्रियेत गायत्री विजय देवरे या विद्यार्थींनीची शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली़ उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री मोनिका निकुम, अर्थमंत्री मोनिका कापुरे, परीपाठमंत्री भाग्यश्री पवार, अभ्यासमंत्री सुनैना भोसले, सांस्कृतिकमंत्री चेतना पाटील, सहलमंत्री पुनम बेडसे, क्रीडामंत्री वैष्णवी लोहार, आरोग्यमंत्री मृणाल पवार, वृक्षसंवर्धनमंत्री पुजा पावरा तर वसतीगृहमंत्री सीमा पावरा यांची निवड करण्यात आली़
बोराडीत शालेय विद्यार्थ्यांना निवडणूकीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:09 IST