Eklavya gas agency in Dhule blasted | धुळ्यातील एकलव्य गॅस एजन्सी फोडली
धुळ्यातील एकलव्य गॅस एजन्सी फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवर अग्रसेन चौकात के़ डी़ मिस्तरी कॉम्प्लेक्समध्ये एकलव्य गॅस एजन्सी आहे़ ही एजन्सी चोरट्यांनी फोडली आणि काही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाºयांसह स्थानिक पोलीस दाखल झाले़ लगोलग श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़ घटनेचे वृत्त पसरल्यानंतर याठिकाणी गर्दी जमा झाली होती़ दरम्यान, याठिकाणी असलेल्या वॉचमनला पिस्तुलचा धाक दाखवून लूट केल्याची चर्चा आहे़ मात्र, चाळीसगाव रोड पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही़ दरोडासारखी अशी कोणतीही घटना घडली नसून केवळ घरफोडीचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले़ घटनेची नोंद अद्याप चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़ 


Web Title: Eklavya gas agency in Dhule blasted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.