जिल्ह्यातील अठरा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:58 IST2021-01-02T11:57:54+5:302021-01-02T11:58:36+5:30
धुळे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३६ ...

जिल्ह्यातील अठरा अहवाल पॉझिटिव्ह
धुळे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, जय गुरुदेव नगर १, जोरावली सोसायटी एकाचा समावेश आहे.
वलवाडी १, जीटीपी स्टॉप १ यांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, प्रल्हाद तात्या नगर शिरपूर १, सुभाष कॉलनी शिरपूर २ यांचा समावेश आहे.
भाडणे कोविड केंद्रातील २६ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, कासारे १ राजेसंभाजी नगर पिंपळनेर येथील दोघांचा समावेश आहे. महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व १५९ अहवाल निगेटिव्ह आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व ५ अहवाल निगेटिव्ह आले. एसीपीएम प्रयोगशाळेतील ७ अहवालापैकी बोरसे नगर धुळे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
खाजगी प्रयोगशाळेतील १६ अहवालापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, यमुना हौ.सो.साक्री रोड महिंदलळे ४, मोहाडी उपनगर १, गोंदुर, धुळे १ व चिंचखेडा येथील एकाचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.