आठ रुग्ण निघाले कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:24 IST2020-12-18T12:24:02+5:302020-12-18T12:24:21+5:30
धुळे : जिल्ह्यातील आणखी आठ कोरोना चाचणीचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार २३६ ...

dhule
धुळे : जिल्ह्यातील आणखी आठ कोरोना चाचणीचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार २३६ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३८५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील सर्व १३५ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व ५५ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व ४८ अहवाल निगेटिव्ह आले. महानगरपालिका कोविड केंद्रातील रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमधील १६१ अहवालांपैकी वाडीभोकररोड परिसरातील एक अहवाल पॉझिटिव्ह आला. भाडणे, ता. साक्री येथील कोविड केंद्रातील सर्व ९५ अहवाल निगेटिव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दहा अहवालांपैकी चार अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, देवपूरपरिसरातील चार जणांचा समावेश आहे.