डमी क्र. ८२० वर्षभरानंतर खाद्य तेल झाले स्वस्त, आता खुशाल खा चमचमीत पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:21+5:302021-06-19T04:24:21+5:30
गृहिणींचे बजेट कोलमडले खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. जेवणातून तळीव पदार्थ गायब झाले होते. अर्धे बजेट खाद्यतेल ...

डमी क्र. ८२० वर्षभरानंतर खाद्य तेल झाले स्वस्त, आता खुशाल खा चमचमीत पदार्थ
गृहिणींचे बजेट कोलमडले
खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. जेवणातून तळीव पदार्थ गायब झाले होते. अर्धे बजेट खाद्यतेल खरेदीत खर्च होत असल्याने चांगलीच काटकसर करावी लागत आहे. आता किंचित घट झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
पूर्वी करडईचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढे करडईचे तेल घाण्यावरून काढून आणले जात होते. मात्र, करडईचे पीक काढण्यासाठी फारसे मजूर मिळत नसल्याने आता पीक घेणे कमी झाले आहे. त्यामुळे आता विकतचे तेल आणावे लागत आहे.
- श्रीराम बोरसे, हातनूर
घाण्याचे तेल हेच शरीरासाठी आरोग्यदायक असते. आत्ताचे बाटलीबंद रिफाईंड तेल हे अनेक आजारांना निमंत्रण देते. याआधी ज्यांची शेंगदाणे, सूर्यफूल व सोयाबीन यांची शेती असायची, अशा शेतकऱ्यांकडून घाण्यावर काढलेले तेल घरात वापरण्यासाठी घेत होतो. मात्र, आता तुरळक ठिकाणीच ते मिळत असल्याने नाईलाजाने विकतचे तेल घ्यावे लागते.
प्रेमराज पाटील, हातनूर
खाद्यतेलाचे आधीचे व आताचे दर
सोयाबीन १६० - १४०
सूर्यफूल - १८० - १६०
शेंगदाणा १८० - १६०
पामतेल १५० - १३०
करडई २०० - २००