डमी क्र. ८४१ हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:45+5:302021-06-24T04:24:45+5:30
हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यावर हा हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन ...

डमी क्र. ८४१ हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?
हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यावर हा हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. अनेकवेळा हवामानाचा अंदाज केवळ पोकळ ठरला आहे. याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११ टक्केच पेरणी झाली आहे. यात कापसाची २० टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी, बाजरी व भात या पारंपरिक पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही. गेल्या दोन वर्षात अतिरिक्त पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. लागोपाठ दोन पावसाळ्यामध्ये ओला दुष्काळ शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविल्याची स्थिती निर्माण झाली असून, कोरडा दुष्काळाची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
मृगात पाऊस गायब
रोहिणीत बरसलेल्या पावसाने मात्र ‘मृग’ नक्षत्रात पाठ फिरविली. ८ जूनपासून मृग नक्षत्राची सुरुवात झाली. मात्र जिल्हाभरात कुठेतरी एक दोनवेळा पाऊस आला. पण सर्वदूर सक्रिय झाला नाही. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जमिनीत ओलावा तयार झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना मृगात पेरणी करता आलेली नाही. त्यातच ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. संपूर्ण मृग कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यात पेरण्या रखडल्या आहेत.
पीकनिहाय क्षेत्र
पीक हेक्टर झालेली पेरणी
ज्वारी ९७२९
बाजरी ५७,५२१
मूग १२,६२१
उडीद ४३७९
भुईमूग १०,४५१
तीळ ३८६
सूर्यफूल ५२
सोयाबीन १८,९२५
तुरीची ५३९
मका १७३९
तालुकानिहाय झालेला पाऊस
जिल्ह्यात ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. तसेच पूर्वहंगामी पावसासह तालुक्यात झालेला पाऊस मिमी
धुळे तालुका १०३६ मिमी
साक्री तालुका ५१७ मिमी
शिंदखेडा तालुका २३४ मिमी
शिरपूर तालुका २०४ मिमी
काेठे किती पेरणी हेक्टर
अपेक्षित पेरणी क्षेत्र
४,१६,९७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी
आतापर्यंत झालेली पेरणी
४४५५ हेक्टर कापसाची लागवड