डमी क्र ८२५ मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण, प्रशासनाचीदेखील डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:15+5:302021-06-20T04:24:15+5:30
एकच प्लाॅट अनेकांना विकला वाशिम शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. यासंदर्भात गेल्या दोन ...

डमी क्र ८२५ मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण, प्रशासनाचीदेखील डोकेदुखी वाढली
एकच प्लाॅट अनेकांना विकला
वाशिम शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांत वाशिम नगर परिषदेकडे मूळ मालकांनी तक्रार दाखल केली; मात्र या धंद्यात पारंगत असलेल्या भूखंड माफियांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे अनेकांना न्याय मिळालेला नाही.
प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी
प्लाॅटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खंबे गाडून तार कुंपण करून घेणे आवश्यक ठरत आहे. यासह पक्की नोंदणी करणेही गरजेचे ठरत आहे. याशिवाय प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कोणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो.
प्लाॅट परस्पर हडपण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यासंदर्भात तक्रार झाल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केला जातो. प्लाॅटच्या मूळ मालकांनीही सतर्क राहायला हवे.
प्लाॅट खरेदीसाठी लाखो रुपये गुंतविल्यानंतर प्लाॅटचा सांभाळ करणेही गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पक्की नोंदणी करून घेणे, प्लाॅटला तार कुंपण करणे, त्या ठिकाणी मूळ मालकांच्या नावाचा फलक लावणे अशा काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष पुरवायला हवे.