डमी क्र. ८२१ आठवडी बाजार सुसाट, मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:24+5:302021-06-19T04:24:24+5:30

पाच कंदील येथे कायमच गर्दी शहरातील पाच कंदील येथील भाजी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी होत आहे. ...

Dummy no. 821 Weeks Market Susat, Mask No Social Distance | डमी क्र. ८२१ आठवडी बाजार सुसाट, मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

डमी क्र. ८२१ आठवडी बाजार सुसाट, मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

पाच कंदील येथे कायमच गर्दी

शहरातील पाच कंदील येथील भाजी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी होत आहे. दुपारपर्यंत माल खराब होतो. दुकानांच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य असते; पण त्या अस्वच्छतेतही भाजीबाजारात लोक गर्दी करत आहेत.

देवपूर मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी झुंबड

आठवडी बाजाराला परवानगी नसल्याने देवपुरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारात दररोज नागरिकांची मोठी गर्दी असते. मनपाकडून येथील व्यावसायिकांना हक्काची जागा दिलेली नाही. त्यामुळे काही महिन्यांपासून येथील बाजार रस्त्यावर भरतो. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात.

शासनाच्या परवानगीनुसार व्यावसायिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली आहे. या काळात मास्क व सोशल डिस्टन्स देखील अनिवार्य केलेले आहे. मात्र, तरीही जर नागरिक किंवा व्यावसायिकांकडून दुर्लक्ष होत असेल तर कारवाई केली जाईल.

- अजिज शेख, आयुक्त मनपा.

Web Title: Dummy no. 821 Weeks Market Susat, Mask No Social Distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.