नकाणे, डेडरगाव तलावातील जलसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:56 IST2019-06-10T13:55:36+5:302019-06-10T13:56:15+5:30

डेडरगाव तलावाचा दिलासा

Due to water drainage in Dedargaon lake, no water can be eaten | नकाणे, डेडरगाव तलावातील जलसाठा खालावला

dhule

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सध्या केवळ ५५ दलघफू जलसाठा उपलब्ध असून तो जुनपर्यंत पुरेल़ मात्र तोपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला जुन महिन्यात टंचाईचा सामना करावा लागू शकतो़
अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावातील शिल्लक जलसाठयातून पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबुन राहावे लागते़ हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरूवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यता आले होते़. त्यामुळे तात्पुर्ता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरूस्ती होत आहे़
डेडरगाव तलावाचा दिलासा
डेडरगाव तलावाची क्षमता १२० एमसीएफटी इतकी आहे. तलावाजवळ जलशुध्दीकरण केंद्र आहे. ५ एमएलडी एवढी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता आहे. या तलावावरुन मोहाडी, मालेगाव जलकुंभ, चक्करबर्डी, दसेरा जलकुंभ व हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला पाणीपुरवठा होतो़ तर अवधानलाही तलावावरुन पाणी मिळते. लळींग कुरणातील अनवर नाल्याला पावसाळ्यात पाणी आल्यावर तो भरुन वाहतो. तो नाला या डेडरगाव तलावाला येवून मिळतो. तलावाची क्षमता लहान आहे.
वेळ निश्चित नसल्यान हाल
शहरातील पाणीपुरवठ्याचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाही. पाणी सोडणाºया कर्मचाºयाला वाटले तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.मात्र वेळेप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जातो़

Web Title: Due to water drainage in Dedargaon lake, no water can be eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे